नाशिक- राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाचे ( Advertising of Rajasthan tourism ) शौचालयावर जाहिराती करण्याच्या कामासाठी मक्ता मिळवून कोट्यवधीचा फायदा करुन देण्याचे आमिष दाखवत नाशिक येथील व्यवसायिकाला तब्बल 6 कोटी 80 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जोधपूर येथील 15 संशयितांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुशील पाटील (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2020 या कालवधीत पाटील आणि त्यांच्या संबंधित व्यवसायिकांना संशयीत सचिन पुरुषोत्तम वेलेरा, वैभव गेहलोत (दोघे रा. जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंह चौहान, नीडल क्राफ्ट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी प्रवीणसिंह चौहान, सुहाभ मकवाल, निरोवभाई विमाभट, राजबीरसिंह शेखावत, बिस्वरंजन मोहंती, सावनकुमार पारनेर, विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, विराज पंचाल, रिशिता शाह यांनी संगनमत कुन राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीचे सर्व मक्ते मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.