महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2022, 8:31 AM IST

ETV Bharat / city

Nashik Bus Accident Fire: नाशिकमधील बस दुर्घटना.. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत.. पालकमंत्री भुसे नाशिककडे रवाना

Nashik Bus Accident Fire: खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला अपघातानंतर आग लागल्यामुळे आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse यांनी सांगितले.

Nashik Bus Accident Fire Many Died Several Injured Announcement of immediate assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased
नाशिकमधील बस दुर्घटना.. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत.. पालकमंत्री भुसे नाशिककडे रवाना

मुंबई:Nashik Bus Accident Fire: विदर्भातील यवतमाळ येथून मुंबईकडे येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला अपघातानंतर आग लागल्यामुळे आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 34 नागरिक अत्यंत गंभीर स्वरूपात भाजलेले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse यांनी मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased शासनाने केली असल्याचे सांगितलं. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री दादा भुसे तेथून त्वरित माघारी फिरलेले आहेत. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी जलदगतीने निघालेले आहेत.



यवतमाळ येथून मुंबईकडे येणारी खाजगी बसला अपघातानंतर आग लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 34 व्यक्ती अत्यंत गंभीर स्वरूपात भाजलेले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.


हा अपघात नाशिक शहराजवळ झाले असल्यामुळे नाशिक येथील पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, 'ही घटना अत्यंत गंभीर आहे. शासन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार आहे. त्याबद्दलची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याशिवाय जखमी व्यक्तींना शासकीय खर्चाने संपूर्ण औषध उपचार करण्याचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे. घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही व्हायला नको होती. मी शासकीय कामानिमित्ताने चंदिगढ हरियाणा या ठिकाणी दौऱ्यावर आलेलो असतानाच ही माहिती मला मिळाली. मी तातडीने आता नाशिककडे परतीच्या मार्गावर आहे. काही तासाने मी घटनास्थळी दाखल होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details