नाशिक -नाशिक मध्ये घरातील बाथरूमच्या गॅस गिझर मधून गॅस गळती झाल्याने 22 वर्षीय तरुणीचा गुदमरुन मृत्यू झाला ( Geyser Leak In Nashik ) आहे. जेलरोड परिसरात ही घटना घडली ( Nashik Jail Road Gas Leak ) आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी अनिल जाधव (22 वर्ष) असे या मृत तरुणीचे नाव ( Sakshi Anil Jadhav Died Gas Leak ) आहे. साक्षी आपल्या परिवारासोबत जेलरोड येथील श्री संकुल अपार्टमेंट येथे राहत होती. ती एमएचं शिक्षण घेत होती. साक्षी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता गिझरच्या गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरला. साक्षीच्या लक्षात येण्याच्या पुर्वी गॅस तिच्या नाका, तोंडात गेला.