नाशिक : नाशिकच्या महिला चेतना पवार (Entrepreneur Chetna Pawar) या आज एक यशस्वी (Nari Shakti) महिला उद्योजिक म्हणून ओळखल्या (successful journey in mushroom industry) जातात. पती किरण पवार यांना त्यांची खंबीर साथ आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या (अळिंबी) मशरूम (mushroom) उद्योगात कार्यरत आहे. सुरवातीच्या काळात अनेक आव्हानांशी सामना करतांना सातत्य, मेहनत, बाजारपेठांचा अभ्यास करत, त्यांनी आज नाशिकसह इतरही राज्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.
चेतना आणि किरण पवार दाम्पत्य हे मूळचे नगर जिल्ह्यातील लोणी (ता.राहाता) येथील आहे. गेल्या 26 वर्षांपासून ते नाशिक मध्ये वास्तव्यास आहे. किरण यांनी रासायनिक अभियांत्रिकी शाखेची पदविका पूर्ण केली आहे. नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून, पवार दाम्पत्याने भांडवल नसताना; घरच्यांकडून 15 हजार रुपये उसणे घेतले. 1998 मध्ये कमी खर्चात टाकाऊ घटकांपासून शेड उभे केले. आणि तेथून त्यांचा प्रवास सुरू झाला. सुरवातीला त्यांनी मशरूम शेती करत नागरिकांना मशरूम चे फायदे (Healthy Mushroom) सांगण्यास सुरवात केली. आणि त्यांना यात यश मिळत गेले. विक्री कौशल्यातून हळूहळू पुढे जात त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. मशरूमची शेती करुन, सध्या राज्यासह परराज्यातील सुमारे 300 व्यावसायिकांना मशरूम बीज ते पुरवतात.
मशरूमचे आहारातील महत्त्व(Healthy Mushroom):पवार दाम्पत्याने मशरूम व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्याबाबत नागरिकांना फारशी माहिती नव्हती. सुरुवातीला उत्पादन सुरू झाल्यानंतर स्थानिक बाजारात मशरूमला मागणी नव्हती. त्यामुळे त्यांच्या समोर अनेक अडचणी आल्यात. मात्र व्यवसायातील सातत्यपणा, मेहनतीच्या जोरावर पवार दांपत्याने ग्राहकांना मशरूमचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यास सुरुवात केली.अशात चेतना पवार यांनी मशरूमचे रोल, बिर्याणी, बिस्किटे, मशरूम पुलाव, पापड, वडी अशा विविध पाककृती बनवून; त्याचे आहारातील महत्व पटवून दिले. त्यांच्या या सर्व प्रयत्नांमुळे त्यांचे ग्राहकांचे मोठे नेटवर्क तयार झाले.
सध्याची करार स्वरुपातील शेती :नाशिकमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानंतर स्पॉनची मागणी वाढत गेली. त्यामुळे त्यांनी उत्पादन क्षमता वाढविली. सोबत कुशल मनुष्यबळ उभे केले. या माध्यमातून देशी प्रकारातील धिंगरी, बटण, मिल्की व पॅडी स्ट्रॉ, तसेच परदेशी प्रकारात 'शिताके' मशरूम व औषधनिर्मितीसाठी आवश्यक मशरूम बियाणे उत्पादन व विक्री सुरू केली. यातून शेतकऱ्यांन सोबतच्या करार पध्दतीच्या व्यवसायाला मोठा वाव मिळाला. सध्या राज्य व परराज्यासह 300 मशरूम उत्पादकांसोबत करार पद्धतीने शेती केली जाते. शेतकऱ्यांना स्पॉन(बियाणांचा) पुरवठा करून, त्यांच्याकडून मशरूमची खरेदी करण्यात येते. आता त्यांची प्रति महिना स्पॉन विक्रीक्षमता 20 टन असून; प्रतिकिलो 80 रुपये दराने विक्री केली जाते.