नाशिक - नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. त्यामुळे ते आजही डॅशींग आहेत. नारायण राणेंनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले, यांनंतर शिवसैनिकांनी याठिकाणी केलेले शुद्दीकरण म्हणजे खरच अशुद्धी असुन हा प्रकार शिवसेनेला शोभणारा नसल्याची टिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असतांना आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका मांडली.
'मराठा आरक्षणाला पाठिंबा,
आमच्या रिपाई पक्षाचा हा मराठा समाजाच्या 12 टक्के आरक्षणाला पाठींबा आहे. संभाजी राजेंच्या नांदेड येथे होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात अशोक चव्हाण सहभागी झाले नसले तरी त्यांचा मराठा आरक्षणाला पाठींबा नाही असे नाही, असे सांगत त्यांनी अशोक चव्हाणांची पाठराखन केली.
'अॅड गुणरत्ने सदावर्ते यांचे वैयक्तिक मत'