महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Muskan Khan Name For Urdu House : मालेगावच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देणार; महापौर ताहेरा शेख यांची घोषणा

कर्नाटकतील हिजाब ( Karnatak Hijab Case ) मुद्यावर लक्ष्य झालेली मुस्कान खान ( Muskan Khan Name For Malegaon Urdu House ) या विद्यार्थीनीने दाखविलेल्या धैर्याबद्दल आणि तीच्या सन्मानासाठी मालेगाव महापालिकेच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यात येणार असल्याचे महापौर ताहेरा शेख ( Malegaon Mayor Tareha shaikh ) यांनी सांगितले आहे.

Muskan Khan Name For Urdu House
Muskan Khan Name For Urdu House

By

Published : Feb 13, 2022, 12:51 AM IST

Updated : Feb 13, 2022, 2:19 AM IST

नाशिक -कर्नाटकतील हिजाब ( Karnatak Hijab Case ) मुद्यावर लक्ष्य झालेली मुस्कान खान ( Muskan Khan Name For Malegaon Urdu House ) या विद्यार्थीनीने दाखविलेल्या धैर्याबद्दल आणि तीच्या सन्मानासाठी मालेगाव महापालिकेच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यात येणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले आहे. उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यासंदर्भातला ठराव महासभेत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

प्रतिक्रिया

आम्ही तीचा सन्मान करणार -

काही दिवसांत मालेगाव महापालिकेत महासभा घेऊन उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यात येणार असल्याचे महापौर शेख यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या जिगरबाज तरुणीचे नाव उर्दू घराला देवून आम्ही तीचा सन्मान करणार आहोत. याबाबत आगामी महासभेत याबाबतचा प्रस्ताव सादर करुन त्याला एकमताने मंजुरी मिळवून देण्याचे आवाहनदेखील महापौर शेख यांनी केले आहे.

कर्नाटकात झालेल्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र तीव्र उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात घोषणाबाजी देणारी तरुणी अचानक प्रकाशझोतात आली असून या तरुणीला मौलाना मदनी यांनी पाच लाखांचे पारितोषिक जाहिर केले आहे. तर दुसरीरकडे मुस्कान खान या तरुणीचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर ताहेरा शेख यांनी मांडला आहे.

हेही वाचा - Gulabrao Patil clarification on controversial statement : अभिनेत्रीचा गाल सोडला व ओम पुरीचा गाल पकडला - गुलाबराव पाटील

Last Updated : Feb 13, 2022, 2:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details