नाशिक - नाशिकरोड येथील हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून ओढणीने गळा आवळून खून केल्याची घडली असून नाशिकरोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कराडच्या वाखान परिसरात महिलेचा निर्घृण खून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही तपासणार
स्वतःहून पोलिसांत हजर
नाशिक रोड येथील बिटको चौकात असलेल्या पवन हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. कोपरगाव येथे राहणारा पोपट पीर हा नाशिक रोड येथील गुलमोहर कॉलनीत राहत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आलेला होता. त्याने बिटको चौकात असल्या पवन हॉटेलमध्ये पत्नीला नेले. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाले. राग अनावर झालेल्या पोपट वीर याने ओढणीने पत्नीचा गळा आवळून जीव घेतला आणि स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे.