नाशिक -सातपूर येथील एका कंपनीत कामगार संघटनेतील युनियनच्या अस्तित्वावरुन दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादात एका पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंडल अध्यक्षाची हत्या केल्याची ( Murder of BJP office bearer ) घटना शुक्रवारी सकाळी सातपूर मधील कार्बन नाका येथील म्हसाेबा मंदिराजळळ घडली. या प्रकरणात सातपूर पाेलिसांनी मुंबईकडे पळण्याच्या तयारीत असलेल्या संशयित मारेकरी पदाधिकाऱ्यास कल्याण ते मुंब्राच्या दरम्यान ताब्यात घेऊन अटक ( suspect arrested by satpur police ) केली. विनायक उर्फ विनाेद बर्वे असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
हत्येच्या घटनेवरून भाजपा आक्रमक -
पूर्वी विनायक बर्वे हा भाजपाचाच पदाधिकारी होता. गेल्या महिन्याभरापूर्वी याने भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बर्वे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातपूरच्या एका कंपनीत भाजपा प्रणित कामगार संघटना कार्यरत असताना या युनियनचा पूर्वश्रमीचा पदाधिकारी विनोद बर्वे बाहेर पडला व त्याने नविन युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने कंपनीने त्याला कामावरुन कमी केले हाेते. उपजिविकेसाठी त्याने नवी युनियन स्थापन करण्याचा रेटा सुरु केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र वंंचित कामगार संघटनेची स्थापना करण्याचा प्रयत्न करत असताना भाजपा व राष्ट्रवादीच्या संघटनांत वाद तयार झाला. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्जही दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी समज दिल्यावर वाद तात्पुरता शमला हाेता. मात्र, त्याची धग कायम होती. मृत अमोल इघे हा भाजपाचा सातपूर मंडल अध्यक्ष होता. तो नेहमी विनोदला समजावायचा. मात्र दोघांचा वाद मिटत नव्हता. शुक्रवारी सकाळी ईघे कार्बन नाका येथील म्हसाेबा मंदिराजवळील कंपनीच्या कामगारांना भेटण्यासाठी निघाले असता, यातील काही सहकाऱ्यांशी त्यांची भेट झाली. त्यात चर्चेतून वाद झाला. वादाचे पर्यावसान त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाला. एकाने त्यांचा गळा चिरल्याने ते जखमी अवस्थेत मंदिराजवळ पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी सकाळी सातपूर पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदाेलन केले. या हत्येने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत संतापाचे वातावरण हाेते.
४ दिवसात नाशिकमधील तिसरी हत्या -