नाशिक -नाशिक शहर अनलॉक झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता आता मनपा आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करत एम जी रोड भागात असलेले एक मोबाईलचे दुकान सील केले आहे. मात्र कारवाई करत असताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जात आहे.
बाजारपेठांमधील गर्दीवर आता मनपा व पोलीस प्रशासनाची नजर.. कारवाईत भेदभाव असल्याचा व्यवसायिकांचा आरोप - नाशिक बाजारपेठांमध्ये गर्दी
नाशिक शहर अनलॉक झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता आता मनपा आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करत एम जी रोड भागात असलेले एक मोबाईलचे दुकान सील केले आहे.
मनपा व पोलिसांचा कारवाई करताना भेदभाव, व्यावसायिकांचा आरोप -
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यान जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करत पार्लर, मॉल्स आणि जिम्स वगळता सर्वकाही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्यास मुभा दिली आहे. मात्र बाजारपेठामधील गर्दी पाहता मनपा पोलीस प्रशासनाने कारवाई करत नाशिकच्या एमजी रोड भागात असलेले मोबाईल दुकान सील केले आहे. मात्र कारवाई करत असताना मनपा आणि पोलीस प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे. मात्र जे नियमांच उल्लंघन करतील, असे व्यावसायिक आणि नागरिकांवर कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
१५ जणांवर कारवाई, 75 हजारांचा दंड -
व्यावसायिकांनी दुकानाच्या आवारात गर्दी करत कोरोनाचे नियमाचे पालन न केल्यामुळे पंधरा जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून जवळपास 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.मात्र बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी पाहता ही गर्दी येत्या काळात पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी देखील हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय नियमांचं पालन करण्याची गरज आहे.