नाशिक - राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपा खुप उत्साही होती. काहीही करून त्यांना सत्ता पाहिजे होती. राष्ट्रवादीसोबत भाजपाने संपर्क साधला होता. मात्र त्याकाळी आमच्यात पारदर्शकता होती. कोण कुठे संपर्क करतोय यामध्ये आमच्यात चर्चा होत होती. अजित पवार शपथ घ्यायला गेले त्यात देखील एक ( Sanjay Raut statement on Ajit Pawar Oath ) पारदर्शकता होती. इतकी मोठी घडामोड होत आहे हे आम्हाला माहिती होतं. पारदर्शकता होती म्हणूनच अजितदादा आणि बाकी आमदार संध्याकाळपर्यंत परत आले, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक ( Sanjay Raut in Nashik ) येथे केले. ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
शरद पवारांनाही ऑफर होती -
महाराष्ट्रात भाजपाला सत्ता स्थापन करायची होती. त्यावेळी सत्तेच्या नशेमुळे भाजपा कोणाबरोबरही जाऊन सत्ता स्थापन करण्यास तयार होती. मग त्यांनी शरद पवारांनाही ऑफर ( BJP Offered to Sharad Pawar ) दिली. हे आम्हाला सर्वांना माहिती होते. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन ( Ajit Pawar Oath With Devendra Fadanvis ) करणार, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती होते. आमच्यात पारदर्शकता होती, कारण आम्हाला सत्ता स्थापन करायची होती. सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये याची काळजी आम्ही स्वतः घेतली होती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसेच आज ज्यांचे घोडे उधळले आहेत, त्यांना एकेकाळी पवार यांनी वाचवले, असेही राऊत म्हणाले.