महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यावर छत्रपती संभाजी राजेंनी भाष्य केले आहे. शांत राहणे ही महाराजांची शिकवण आहे. मी मराठा समाज आक्रमक होण्याआधी मार्ग काढणार. मी महाराष्ट्र पिंजून काढतोय. २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर मुंबईत माझी स्पष्ट भूमिका मांडणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

maratha reservation ,  MP Sambhaji Raje attacks on center ,  MP Sambhaji Raje attacks on state government ,  maratha reservation ,  MP Sambhaji Raje ,  छत्रपती संभाजी राजे ,  मराठा आरक्षण ,  मराठा आरक्षण रद्द
छत्रपती संभाजीराजे

By

Published : May 20, 2021, 1:27 PM IST

नाशिक - 'मी शांत आहे ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होण्याआधी मार्ग काढणार, मी महाराष्ट्र पिंजून काढतोय. मराठा आरक्षणप्रश्नी अभ्यासू लोकांशी चर्चा करतोय. २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर मुंबईत स्पष्ट भूमिका मांडणार आहे. तसेच सगळ्या मराठा आमदार आणि खासदारांना माझी वार्निंग असून मराठा समाजाने २७ मे पर्यंत शांत रहावे,' असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करताना..

आंदोलन कसे करायचे हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही-

नाशिकमध्ये शासकिय विश्रामगृहात गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मराठा आरक्षणाप्रश्नी भूमिका मांडली आहे. 'माझी भूमिका ही समाजाची भूमिका आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा भेटीसाठी परवानगी मागितली, परंतु भेटीची वेळ मिळाली नाही. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे, की मराठा समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका, समाजाला दिलासा द्या. आंदोलन कसे करायचे हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मला आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतील' असेही ते म्हणाले. तसेच १०२व्या घटनादुरुस्तीवर मी २७ मे ला बोलेल, इतर राज्यात आरक्षण मिळाले. मग महाराष्ट्रात का नाही? राज्य सरकारला मी स्वतः सूचना दिल्या होत्या. माझ्या काही सूचना त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडल्या नाहीत. आता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र निर्णय घ्यावा. माझ्यासाठी मराठा समाज महत्वाचा आहे. २७ मे पर्यंत सरकारने अभ्यास करावा, चिंतन करावे. उद्या माणसं मेली तर जबाबदार कोण? मी समाजाची दिशाभूल करत नाही दिशा देतो, असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले आहे.

नियुक्तीची प्रक्रिया का रखडवताय -

राज्य सरकारच्या हातात काही गोष्टी आहे. नियुक्तीची प्रक्रिया का रखडवताय, असा सवाल उपस्थित करत प्रलंबित असलेल्या नौकऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, असे सरकारला आवाहन करत पदोन्नती आरक्षण २७ मे चा जीआर, सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार योग्यच असल्याचे मत त्यांनी या वेळी मांडले आहे.

आरक्षणात आडवा येणाऱ्याशी दोन हात करण्याची तयारी -

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जर कोणी आडवा येत असेल तर त्याच्याशी दोन हात करण्याची मी संभाजीराजे भोसले म्हणून माझी तयारी आहे. मी माझ्यासाठी लढत नाही तर समाजासाठी लढतो आणि समाजाचे नेतृत्व नाही तर समाजातील नागरिक म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करतो, असे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने आपल्या हातात असलेल्या या काही गोष्टी प्रथम स्तरावर कराव्यात म्हणजे समाजाला न्याय दिल्यासारखे होईल. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. वाद कोणाचा आहे हा प्रश्न वेगळा असून समाजासाठी मी काहीही करू शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details