महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hemant Godse Criticizes On Sanjay Raut : संजय राऊत शिवसेनेतील सडका कांदा : खासदार हेमंत गोडसे

शिवसेनेतील खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) हे दिल्लीतील सर्व राजकीय घडामोडीनंतर ( Shiv Sena as Twelve MP in Shinde Group ) प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी इच्छामणी लाॅन्समध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी संजय राऊतांवर कठोर शब्दांत टीका ( Hemant Godse Criticizes On Sanjay Raut ) केली. तसेच, आम्ही विकासाच्या कामांसाठी शिंदे गटात सामील झालेलो आहोत. सत्तेसाठी आम्ही कुठलेही बंड केले नाही.

MP Hemant Godse
खासदार हेमंत गोडसे

By

Published : Jul 23, 2022, 10:39 AM IST

नाशिक : शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात सामील ( Shiv Sena as Twelve MP in Shinde Group ) झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का होता. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडीनंतर प्रथमच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) हे 22 ता तारखेला नाशिकमध्ये दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यावेळी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर कठोर शब्दांत टीका ( Hemant Godse Criticizes On Sanjay Raut ) केली. मेळाव्यात बोलताना त्यांनी विकासकामांकरिता कार्यकर्त्यांना आवाहन केले.

संजय राऊतांवर टीका : नाशिकमध्ये घेतलेल्या मेळाव्यात खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊत हे रोज सकाळी उठातात, टीव्हीसमोर येऊन बडबड करीत असतात. तसेच, खासदार संजय राऊतांमुळे राज्यातील जनमानसात शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे एखाद्या टोपलीतील सडका कांदा बाजूला ठेवावा त्याप्रमाणे राऊत यांना आवर घालणे गरजेचे असल्याचा घणाघाती आरोप खासदार हेमंत गोडसे यांनी केला. खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सामील झाल्यानंतर आज गोडसे दिल्लीतून नाशकात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात गोडसे यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

खासदार हेमंत गोडसेंचे जंगी स्वागत : शिवसेना आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 12 खासदारदेखील शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. या खासदारांमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही सहभाग आहे. दिल्लीत राजकीय घडामोडीनंतर 22 तारखेला खासदार गोडसे नाशकात दाखल झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

संजय राऊत यांना आवर घाला :आम्ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वी आम्ही प्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली. आपण भाजपासोबत जायला पाहिजे महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती असून, संजय राऊत यांना आवर घाला, अशीही मागणी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर वेळेवर निर्णय न झाल्याने आम्ही शिंदे गटात दाखल झालो आहे..



हेही वाचा :MP Hemant Patil Challenge to Opponent : कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास शिंगावर घेण्यास सक्षम - हेमंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details