नाशिक -सरकारने पुढच्या सोमवारपर्यंत मंदीरे उघडा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीकडून सरकारला देण्यात आला आहे. आज भाजप आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर मंदीरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 'दार उघड, उद्धवा दार उघड' अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला, यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंदिराबाहेर रस्त्यावर पूजा करून त्र्यंबकराजाची आरती केली. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने मोठया प्रमाणात भाविक मंदिरात येतील म्हणून मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनेकांचे व्यवसाय बंद -
कोरोना नियमात सरकारने बहुतांश जिल्ह्यात शिथिलता दिली आहे. यात सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अशात फक्त मंदिर बंद असून यावर अवलंबून असलेली पूजा साहित्याचे व्यवसाय अडचणीत येत असून यावर उपजीविका चालवणाऱ्या हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचं म्हणतं लवकरात लवकर मंदिर सुरळीत सुरू करावी, अन्यथा राज्यभर केलं जाईल असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे.
गोदावरीच्या उगमस्थानी -