नाशिक - सोशल मीडियावर वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन आणि विनातारण पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देत ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार ( Mobile Loan App ) वाढतं आहे. 50 हजारांच्या कर्जासाठी 20 हजारांपर्यंत प्रोसेसिंग फी घेतली जात असून, हफ्ते चुकवल्यास कर्जदाराचे मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो व्हायरल करत बदनामी केली जात आहे. याबाबत आतापर्यंत 27 तक्रारी नाशिकच्या सायबर पोलिसांत दाखल झाल्या ( 27 Complaints register against nashik cyber police ) आहेत.
असे केले जाते ब्लॅकमेल -नागरिक कर्ज घेताना आधार, पॅनकार्ड आणि बँकेची माहिती ऑनलाईन देतात. अधिक रक्कम उकळण्यासाठी कर्जदाराला ब्लॅकमेल केले जाते. कर्जदाराचे फोटो मॉर्फिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी केली ( Mobile Loan App Threat make pornographic photos viral ) जाते.
मोबाईलच्या डाटाचा ब्लॅकमेलसाठी वापर -ऑनलाइन कर्ज घेताना कर्जदाराला लिंक पाठवली जाते. त्यामाध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश ( एक्सेस ) मागितला जातो. त्यामुळे तुमच्या फोन मधील मॅसेज, फोटो, नंबर कर्ज देणाऱ्याकडे जातो. जर, ग्राहकाने कर्ज थकवले तर त्याच्या संपर्कातील सर्व मित्र आणि नातेवाईकांना माहिती शेअर केली जाते. तुम्ही फ्रॉड असून तुमच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका, असे सांगितले जात धमकी देण्यात येते.
कशी घ्याल काळजी -मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंक, मेसेजचा प्रतिसाद देऊ नका. अशा लिंक डिलीट करा. आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. शक्यतो ऑनलाइन कर्ज घेऊ नका. कर्ज घ्यायचे असल्यास ते बँक किंवा पतसंस्था मधूनच घ्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली आहे.