महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मी नाशिकला येतोय..! पण गर्दी करू नका; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन - उदयराजेंच्या नातेवाईकांचे लग्न

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मामा नित्तरंजन धैर्यशीलराव पवार यांच्या मुलाचा 5 मार्चला विवाह समारंभ आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मात्र नाशिकला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे

RAJ THACKERAY
मी नाशिकला येतोय..! राज ठाकरे

By

Published : Mar 3, 2021, 9:19 AM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असून कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेत्यांचे दौरे, मेळावे, बैठकांवर देखील झाला आहे. अशा परिस्थितीत प्रदिर्घ काळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. `मी नाशिकला येतोय. पण गर्दी करु नका; असे आवाहन राज ठाकरे यांनी मुंबईत भेटायला आलेल्या नाशिक पदाधिकाऱ्यांना केले आहे.

उदयनराजेंच्या निमंत्रणावरून राज यांचा नाशिक दौरा-

राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा खासगी आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मामा नित्तरंजन धैर्यशीलराव पवार यांच्या मुलाचा 5 मार्चला विवाह समारंभ आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मात्र नाशिकला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नाशिकचे शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी मुंबईत कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना ही माहिती दिली.

कोणीही गर्दी करू नका-

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असल्याने आणि तो देखील अनेक दिवसांनी होत असल्याने कार्यकर्ते स्वागतासाठी गर्दी करतील याची कल्पना राज ठाकरे यांना आहे. नाशिक मध्ये राज ठाकरे यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे. अनेकदा या उत्साहात कार्यकर्ते कोरोना संदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मी येणार आहे, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवा, कोणीही गर्दी करु नये, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज ठाकरे वापरत नाहीत मास्क-

राज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांकडून कोरोना नियामांचे दुर्लक्ष केले जात असल्याने राज यांनी काळजी घेतली आहे. असे असले तरी राज ठाकरे स्वत: सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या शिवाय मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित मुंबईतील कार्यक्रमातही राज ठाकरे यांनी मी मास्क वापरत नाही, असे स्पष्टफणे सांगत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना फाटा दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details