नाशिक -भाषणामध्ये अनेक नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य पाहिली आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले नव्हते. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला, अशी टीका करत युती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर साधला आहे.
भाजपा-शिवसेना एकत्र येऊ नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न - खोत - nashik news in marathi
इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले नव्हते. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला, अशी टीका करत युती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर साधला आहे.
![भाजपा-शिवसेना एकत्र येऊ नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न - खोत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12883378-127-12883378-1629978356992.jpg)
भुजबळांना टोला
नाशिक येथे आ. खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणे विरुद्ध शिवसेना संघर्षावर ते बोलत होते. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडून इतर प्रश्न तयार करण्याचे काम सुरू आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत. याकडे लक्ष वेधत मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती, याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली आहे.
Last Updated : Aug 26, 2021, 5:39 PM IST