आमदार फरांदे यांची नाशिकमधील अवैध धंद्यांविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार - MLA Farande's complaint against illegal trades
नाशिकमध्ये पोलीस प्रशासन विरुद्ध आमदार हा वाद विकोपाला पोहोचला होता. याच वादातून आमदार फरांदे यांनी गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे शहरातील अवैध धंद्यांना विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांविरोधात मोर्चा काढल्याने फरांदे विरोधात गुन्हा दाखल केला होता.
नाशिक - भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्याविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांसह मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढल्यामुळे भाजप आमदार फरांदे यांच्यासह 200 जणांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच नाशिकमध्ये पोलीस प्रशासन विरुद्ध आमदार हा वाद विकोपाला पोहोचला होता. याच वादातून आमदार फरांदे यांनी गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे शहरातील अवैध धंद्यांना विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांविरोधात मोर्चा काढल्याने फरांदे विरोधात गुन्हा दाखल केला होता.
नाशिक शहरात गुन्हेगारी वाढते - फरांदे
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी बळकावत असल्याचे समोर येत आहे दिवसागणिक शहरात खून हाणामारीचे चैन स्नॅचिंग यांसारख्या विविध घटनांमध्ये वाढ होत असून ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजप आमदार फरांदे यांनी थेट गृहमंत्री यांची भेट घेऊन याविरोधात तक्रार केली आहे तर काही दिवसांपूर्वी पोलिसांविरोधात इंदिरा नगर पोलिस ठाण्यासमोर मोर्चा काढल्यामुळे भाजप आमदार फरांदे यांच्यासह दोनशे जणांवर इंदिरानगर पोलीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यावेळी आमदार फरांदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण शहरातील अवैद्य धंदे विरोधात शासनदरबारी धाव घेणार असल्याचे स्पष्ट केलं होतं त्याच अनुषंगाने बुधवारी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्यात विरोधात थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे यामुळे आता भाजप आमदार फरांदे विरुद्ध नाशिक पोलिसांमधील वाद अधिक विकोपाला गेला असल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे आता राज्य शासन या पत्राची दखल घेत नाशिक शहर पोलिसांना काय आदेश देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.