नाशिक- नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सोमवारी नाशिक दौर्यावर असताना मंत्री उदय सामंत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठी अभिजात भाषा दर्जाबाबत विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका केली.
हेही वाचा -Natya Parishad awards : डाॅ. माेहन आगाशे, संजय पवार, गिरीश सहदेव यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
शिक्षणाचा विस्तार सर्वत्र होऊन सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. यानुसार नाशिक येथील उपकेंद्राचे काम करण्यासाठी त्वरीत निविदा प्रक्रीया पूर्ण करून पुढील नियोजित कामास गती देण्यात यावी. तसेच, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय
सोमवारी नाशिक दौर्यावर असताना मंत्री उदय सामंत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठी अभिजात भाषा दर्जाबाबत विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका केली. मराठीला अभिजात भाषा दर्जा भाषा दिनी मिळावा, अशी अपेक्षा होती. प, दुर्दैवाने तो मिळाला नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. तसेच नाशकात, मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आहे. पुणे विद्यापीठ उपकेंद्राबाबतच्या कायदेशीर अडचणी दूर करणार आहे. राज्यातील पॉलिटेक्निक परीसर स्वच्छ राखण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. पुणे विद्यापीठ जागा मालकी दावा कोणी केला असला तरी, अद्याप स्टे नसल्याने सगळी कामे सुरू आहे. मुक्त विद्यापीठ रत्नागिरी, बारामती उपकेंद्र सुरू करत असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, नाशिक उपकेंद्राचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कामाचा पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मंत्री सांमत यांनी दिल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व मुक्त विद्यापीठाच्या समन्वयाने घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरिता राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याला क्रिडा संस्कृतीचा वारसा असल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -Nashik Fire : इगतपुरीत एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही