नाशिक - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ( classical language status for Marathi ) ही चळवळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी १२ कोटी मराठी जनता राष्ट्रपतींना पत्र पाठविणार ( 12 crore letters to president for classical language status ) असल्याची माहिती मराठी भाषा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते अखिल भारतीय ९४ व्या मराठी साहित्य संमेलनातील मराठी भाषा दालनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai ) म्हणाले, की मराठी भाषा अभिजात असल्याचा अहवाल केंद्राच्या भाषा समितीला देण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. साहित्य संमेलनातील अभिजात भाषा दालन ( Abhijat Bhasha QR code in Sahitya Sanmelan ) प्रदर्शनात क्यूआर कोडदेखील आहे. तो स्कॅन केल्यास थेट राष्ट्रपतींना पत्र जाईल, असे देसाई यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-Marathi Sahitya Sammelan - 93 वर्षांत प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल मेळाव्याचे आयोजन
केवळ केंद्र सरकारची मान्यता बाकी-
दक्षिणेतील चार भाषा तसेच उडिया आणि संस्कृत या सहा भाषांप्रमाणेच मराठी भाषा अभिजाततेच्या दर्जाला पात्र आहे. त्याबाबत संबंधित तज्ज्ञ समितीकडे दिलेले सर्व पुरावे ग्राह्य मानून मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याची शिफारस ( Minister Subhash Desai on classical language status ) केंद्र सरकारकडे समितीने केलेली आहे. त्यामुळे केवळ केंद्र सरकारची मान्यता मिळवून हा टप्पा बाकी असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-Marathi Sahitya Sammelan मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील, तर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे