नाशिक - विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल वाजणार नाही तर फुटणार, असे वक्तव्य पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. ते आज नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी गणपतीची आरती करत ढोल वाजवून आनंद व्यक्त केला.
नाशिकमधील गणेश मिरवणुकीत विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन हेही वाचा -औरंगाबादेत संस्थान गणेशाच्या पुजनाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चंद्रकांत खैरेंनी धरला ठेका
जुने नाशिक भागातून पारंपरिक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस महाजन यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी हातात ढोल घेऊन लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी महाजन म्हणाले, गणपतीच्या आशीर्वादामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेचा निकाल ही आमच्या बाजूनेच लागणार आहे. गणपती बाप्पा नेहमी चांगल्या लोकांसोबत असून तो आमच्या बरोबर आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा -गणपती विसर्जन मिरवणूक: नाशिक ढोलच्या तालावर वाहतूक पोलिसांनी धरला ठेका
मिरवणूक कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अनेक नेते मंडळी उपस्थित होते.