नाशिक - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेबद्दल प्रेम वाटावे अशी परिस्थिती नाही. त्याने पोलिसांना मारले हे चुकीचेच आहे. तो कशाही पद्धतीने मरू द्या त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी दुबे एन्काऊंटरचे समर्थन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्यावरही टीका केली आहे. फडणवीस राज्यात दौरा करतात ही चांगली बाब आहे. मात्र, त्यांचे सरकार असताना विरोधी पक्षाच्या दौर्यात शासकीय अधिकार्यांनी जाऊ नये, असा आदेश काढला होता, अशी आठवण त्यांनी फडणवीस यांना करुन दिली.