नाशिक - ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2021 ) आज (रविवारी) अखेरच्या दिवशी गालबोट लागले आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ( Senior Journalist Girish Kuber ) सातत्याने संभाजीराजेंबाबत वादग्रस्त विधान करत असल्याचा आरोप करत या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ( Activists of Sambhaji Brigade Threw Ink ) संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या पाठीमागे गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकून ( Throwing Ink ) त्यांचा निषेध नोंदवला. मात्र विचारांचा लढा विचारांनी लढा, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून प्रत्येकाला येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली ही घटना दुर्दैवी असून अभ्यासपूर्ण लेखन असावे. पटले नाही तर वैचारिक लढा करावा, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर सरकारी यंत्रणा योग्य ती कारवाई करेल. असेही यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.
- पोलिसांनी दोघांना केली अटक
ज्येष्ठ पत्रकार, लेखक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाई फेक करून खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान पोलिसांनी या दोघांना अटक केली असून ते दोघेही पुण्यातील रहिवासी असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
- 'पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी योग्य नाही'