नाशिक - जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचानक जलसंपदा विभागाला भेट देत (Minister Bachchu Kadu visit wrd nashik) पाहणी केली. अचानक दिलेल्या भेटीने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंतेच कार्यलयात गैरहजर होते. अधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी चांगलेच धारेवर धरले तर, कामात कसूर करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश बच्चू कडू (Minister Bachchu Kadu) यांनी दिले.
माहिती देताना राज्यमंत्री बच्चू कडू हेही वाचा -Nashik : पोलीस भरतीतील अपयशामुळे नाशिकमध्ये युवकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या
कामांच्या, हजेरीच्या निट नोंदी ठेवल्या जात नसल्याचे उघड
यावेळी बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची शाळाच घेतली (Minister Bachchu Kadu visit wrd nashik). कडू यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली होती. मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भांबेरे यांची दोन दिवसांची पगार कपात करण्यात आली आहे. तसेच, झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे. कामांच्या, हजेरीच्या नीट नोंदी ठेवल्या जात नसल्याची यामध्ये उघड झाली. तर, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या कामावरही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
नागरिकांना या ठिकाणी योग्य ती माहिती मिळत नाही
शासन नियमाप्रमाणे नागरिकांची सनद फलक तसेच, इतर आवश्यक कागदपत्रांबाबत जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी विचारणा केली असता, या ठिकाणी अनेक कामकाजांत त्रुटी आढळून आल्या. याबाबत बोलताना राज्याचे जलसंपदामंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की, कार्यालयामध्ये अचानकपणे येण्याचे मुख्य कारण म्हणजे, नागरिकांना या ठिकाणी योग्य ती माहिती मिळत नाही आणि नागरिकांचे कामकाज होत नाही, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींबाबत सत्यता पडताळण्यासाठी मी आलो होतो. मला या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. तातडीने जे कर्मचारी आणि अधिकारी गैरहजर आहेत त्यांचे दोन दिवसांचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांच्या आवश्यक त्या बाबी आणि आवश्यक ते फलक लावण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे. अचानक मंत्र्यांनी दौरा केल्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -Marathi Sahitya Sammelan मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील, तर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे