नाशिक - महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिलिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात देशभरातून आलेले भाविक नतमस्तक झाले. मनातली इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिरात पहाटे पासूनच काकड आरती, महापूजा, अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाशिवरात्री: त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात लाखो भाविक नतमस्तक - News about Trimbakeshwar
महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिलिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात देशभरातू आलेल्या भविकाणी भगावान महादेवाचे दर्शन घेतले. याठीकाणी मागीतलेली इच्छा महादेव पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर गाव वसले आहे, या मंदिराला मोठा इतिहास आहे. देवगिरीच्या यादव राजांची सत्ता त्रंबक परिसरावर असतांना राजा रामचंद्र यादव यांनी इस 1290 च्या सुमारास येथे भव्य मंदिर निर्माण केले होते. त्याचबरोबर कुशावर्त तीर्थ पासून अहिल्या गोड संगमा पर्यंत दगडी घाट निर्माण केल्याचे सांगितले जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाचे परचक्र आले आणि यादवकालीन मंदिराची पडझड झाले. पेशवेकाळात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या 1740 ते 1760 साली मंदिराचा जिर्णोद्धार केला. या जागेवर भव्य मंदिर उभारले, त्याकाळी हे मंदिर बांधण्यासाठी 16 लाख रुपये खर्चाचा खर्च आला. 1785 साली श्रीमंत सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत देवालयाचे काम पूर्ण झाले, या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असून मेरू व माळवा शिल्पशास्त्राच्या संमिश्र रचनेत देवालयाची निर्मिती केली असून, भव्य पटांगणाच्या मध्यभागी पूर्णभिमुख देवालय आहे. या मंदिराभोवती पाच मीटर उंचीच्या ताटाला पाच दरवाजे आहेत. भाविकांसाठी चार दिशांना चार दरवाजे आणि पश्चिमेकडील श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या इमारतीचे प्रवेशद्वार हा पाचवा दरवाजा स्वतंत्र आहे. या मंदीरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. त्याच्या शिवलिंगाच्या शीर्षमध्ये सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत, हे लिंग ब्रह्म, विष्णू आणि शिव म्हणजेच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या शक्तीचे प्रतीक आहेत.
हे लिंग स्वयंभू असून गंगा-गोदावरी त्यांना अभिषेक करताना इथे दिसते, मुघलांकडून म्हैसूरच्या राजाकडून पाचू- हिरे जडित मुकुट बळकावला होता, तो मुकुट भाऊसाहेब पेशवे यांनी मुघलांकडून मिळवून तो त्र्यंबकेश्वराच्या चरणी अर्पण केला. दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा नाशिक तसेच त्रंबकेश्वरमध्ये भरत असतो. यात देशभरातून लाखोंच्या संख्येने साधू महंत आणि भाविक सहभागी होते असतात. त्रंबकेश्वर महादेव मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.