नाशिक- पाथर्डी फाटा परिसरात दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळी गॅसवर दूध तापवताना हा प्रकार उघडकीस आला. आनंद नगरमधील द्वारकेश सोसायटीत हा प्रकार घडला आहे.
नाशकात दूध तापवल्यानंतर झाले रबर; भेसळीच्या प्रकाराने खळबळ - दुध
दुधामधील गाठी ह्या रबरासारख्या ताणल्या जाऊ लागल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

आनंद नगरमधील द्वारकेश सोसायटीतील रामाधार रामशिस सिंग यांनी सोमवारी सायंकाळी आनंद नगर पोलीस चौकी समोरील आई आश्रम स्वीट बाहेरील दूध विक्रेत्याकडून नेहमी प्रमाणे दूध खरेदी केले. दरम्यान आज सकाळी दूध गॅसवर तापविण्यासाठी ठेवले असता त्यातून वेगळाच गंध येवू लागला. दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्याने सिंग यांनी भेसळीचा प्रकार बघण्यासाठी सोसायटीतील लोकांना व स्थानिक नगरसेवकांना बोलावले.
दुधामधील गाठी या रबरासारख्या ताणल्या जाऊ लागल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.