नाशिक- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतही कोरोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडालीय.
व्यापाऱ्याला आणि हॉटेल व्यावसायिकाला कोरोनाची लागण, नाशिक बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय - corona patient in Nashik
नाशिक येथील बाजार समितीमधील व्यापाऱ्याला आणि हॉटेल व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून पुढील तीन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संपतराव सकाळे यांनी घेतलाय.
नाशिक बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय
बाजार समितीमधील व्यापाऱ्याला आणि हॉटेल व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाल्याने उद्यापासून पुढील तीन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संपतराव सकाळे यांनी घेतलाय. मात्र बाजार समिती तीन दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होणार आहे. लाखो रुपयांचा व्यवहार ही ठप्प होणार आहे. तरीही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, कारण पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढ होऊ नये म्हणून पुढिल तीन दिवस बाजार समिती बंद असणार आहे.