महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray In Nashik : राज ठाकरेच्या दौऱ्यात पक्षात मेगा भरती, मात्र पक्षाला उभारी देणारे किती? - राज ठाकरे नाशिकमध्ये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची ( Raj Thackeray Maharashtra Daura ) सुरवात नाशिकला पक्ष प्रवेशाने झाली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्वाचा असला, तरी एकही मोठा चेहरा पक्ष प्रवेशादरम्यान दिसून आला नाही.

Raj Thackeray In Nashik
Raj Thackeray In Nashik

By

Published : Dec 16, 2021, 9:26 PM IST

Updated : Dec 17, 2021, 12:37 PM IST

नाशिक-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची ( Raj Thackeray Maharashtra Daura ) सुरवात नाशिकला पक्ष प्रवेशाने झाली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्वाचा असला, तरी एकही मोठा चेहरा पक्ष प्रवेशादरम्यान दिसून आला नाही.

प्रतिक्रिया

पक्षप्रवेशावेळी आजी-माजी नगरसेवकांची गैरहजेरी -

राज्यात एक आमदार नाशिकमध्ये केवळ 5 नगरसेवक तरीही राज ठाकरे ( Raj Thackeray In Nashik ) यांचा करिश्मा कायम आहे. हे आजच्या गर्दीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मात्र, या गर्दीत पक्षाला उभारी देणारे मुरब्बी किती आणि कोणते याचे उत्तर मात्र सापडत नाही. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी राज यांचा दौरा असल्याचे पदाधिकारी सांगतात. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने प्रवेश सोहळाही रंगला. मात्र, त्यात एकही मोठा नेता किंवा आजी-माजी नगरसेवक दिसून आला नाही.

'जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार' -

आजच्या प्रवेश सोहळ्यात शिवसेना वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते, डॉक्टर, दिव्यगांनाही मनसेत प्रवेश केला. राज भेटीने दिव्यांग ही सुखावले. मात्र, या गर्दीचा पक्षाला किती फायदा किती होणार, हे वेळच ठरवेल. पक्षात सैनिकांची गर्दी तर होते, पण मुररबी सेनापती नसल्याने राज्य कसे मिळणार हा प्रश्न आहे. मनसे थिंक टॅन्कचे प्रधान असणारे बाळा नांदगावकर यांनी इतर कुठलाही पक्ष फोडणार नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार, असे स्पष्ट केले आहे. मनसे अध्यक्षांनी निवडणूक पुढे आहे. सध्या अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे पुढे काय होते, ते बघू असे म्हणत गर्दीचे स्वागत केले.

राज ठाकरेंचा नाशकातील दौरा चर्चेत -

नाशिकचा धावता दौरा आटोपून राज औरंगाबादला आणि पुणे दौरा केला. त्यानंतर कोकण विदर्भात ही दौरा करणार आहेत. राज्य सरकारचा समाचार घेताना रजा अकादमीला रजा देण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुढे काही केले तर आम्ही आहोतच, असा इशारा देत हिंदुत्ववाचा संदेश ही मतदारांपर्यंत पोचविला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा पुन्हा एकदा केवळ चर्चेत राहतो, की त्यातून पक्षाला काही फायदा होतो. हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे.

हेही वाचा -Maharashtra SSC HSC Exam 2022 Schedule - इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' आहेत तारखा

Last Updated : Dec 17, 2021, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details