महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिंडोरीतील कसबेवणी येथील ग्रामीण रुग्णालय 15 दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना - ग्रामीण रुग्णालय वणी दिंडोरी

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कसबे वणी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाची दुरावस्था पाहून आमदार झिरवाळ चांगलेच संतापले. तसेच मागील 15 दिवस रुग्णालय वैद्यकीय अधिक्षकांविना असल्याचे दिसून आल्याने त्यांनी आरोग्य यंत्रणेबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.

vani hospital dindori
ग्रामीण रुग्णालय वणी दिंडोरी

By

Published : Jun 16, 2020, 5:11 PM IST

दिंडोरी (नाशिक) : कोरोना विषाणूचा दिंडोरी तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कसबे वणी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाची दुरावस्था पाहून आमदार झिरवाळ चांगलेच संतापले. तसेच मागील 15 दिवस रुग्णालय वैद्यकीय अधिक्षकांविना असल्याचे दिसून आल्याने त्यांनी आरोग्य यंत्रणेबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.

'आम्ही सत्ताधारी आणि सर्व विरोधक देखील कोरोना महामारीमध्ये एकत्रित काम करत आहोत. परंतु, कसबेवणी येथील रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक मागील पंधरा दिवसांपासून वैयक्तिक रजेचे कारण देत कामावर नाहीत. त्यांच्या जागेवर दुसरा डॉक्टर जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला नाही. असे कामात कसूर करणारे अधिकारी हवेत कशाला. त्यांची त्वरित बदली करण्यासाठी मी जिल्हा शल्य चिकीत्सकासोबत बोललो आहे' असे यावेळी झिरवाळ यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

आमदार नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: वणी-सापुतारा-सुरत पर्यायी मार्गाची दुरुस्ती सुरू करा, विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश

'देशात आलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आपापल्या कुटुंबियांना बाजूला ठेवत नोकरीवर हजर राहत आहेत. परंतु, कसबेवणी येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक 15 दिवसांपासून रजेचे कारण देत सेवेत हजर नाहीत. म्हणून आपण नाशिकच्या जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र कोणीही रजेवर गेले नसल्याचे सांगीतले' असा खुलासा देखील नरहळी झिरवाळ यांनी केला.

ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत झिरवाळ यांनी व्यक्त केली नाराजी...

वणी येथील या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिल्यानंतर येथील दुरावस्था पाहुन आमदार झिरवाळ चांगलेच संतप्त झाले. त्यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. 'आपल्या ग्रामीण रुग्णालयात cne सॅनिटायझर पहायला मिळाले नाही. रुग्णालयातील बेडवर रक्ताचे डाग तसेच आहेत. चादरींची दुरावस्था झालेली आहे. अशी परिस्थिती पाहता काहीच सुविधा असणार नाहीत तर असले दवाखाने हवेत कशाला? असा संतप्त सवाल झिरवाळ यांनी केला.

'ज्या अधिकाऱ्याच्या भरवशावर रुग्णालय चालते, तोच अधिकारी 15 दिवस सेवेत हजर नसेल, तर त्याची येथून त्वरित बदली केली पाहिजे.' यासाठी आपण नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत बोललो आहे. तसेच या ग्रामीण रुग्णालयात त्वरित चांगल्या डॉक्टर येईल, असा विश्वास झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details