नाशिक - महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनापासून भाजपच्या नेत्यांना दूर ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नाही. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्याचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आपण केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांना सांगितले आहे असही महापौर म्हणाले आहेत.
प्रतिक्रिया देताना महापौर कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली
नाशिकमध्ये होत असलेले ९४ साहित्य संमेलन हे सुरुवातीपासूनच वादात आहे. साहित्य संमेलनाचे ठिकाण कुठले असावे त्यावरून वाद होता. त्यानंतर साहित्य संमेलन हे कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष पुढे ढकलले गेले. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik) त्यानंतर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असावी की नसावी, हा वाद होता. एवढेच नव्हे तर साहित्य संमेलनात शरद पवार यांचा सत्कार करावा की नाही, त्यालाही विरोध झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकच्या केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत ही नाव नाही. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली आहे. संमेलनापासून भाजपच्या नेत्याने दूर ठेवले जात असल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्याची टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, संमेलनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या ग्रंथ दिंडीलाच महापौर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनातील मानापमान नाट्य अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक सावरकर प्रेमीच्या आक्रमक भूमिकेनंतर स्वागत गीतामध्ये सावरकरांचे नाव घेण्यात आले
साहित्य संमेलनाच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेले स्वागतगीत त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नसावा यासारख्या वेगवेगळ्या घटनांवरून साहित्य संमेलन हे वादातच अडकत गेले. आता अवघ्या दोन दिवसांवर साहित्य संमेलन आले असताना अद्यापही वाद सुरूच आहेत. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) या आधी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये सावरकर यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र, मनसेने आणि सावरकर प्रेमीच्या आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गीतामध्ये नाव घेण्यात आले होते.
कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही
नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आहे. या साहित्य संमेलन कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आली असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्यात असून, संमेलनस्थळी सुरू असलेल्या कामांची स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास वेगळी व्यवस्था करू
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज सकाळपासून पाऊस जरी सुरू झाला असला तरी आवश्यक ती खबरदारी आपण घेतलेली आहे. पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच, कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाहीत. मुख्य मंडप हा पावसापासून पूर्ण संरक्षण होईल या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण होणार नाही. केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत. याठिकाणी पहिल्यापेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनस्थळी सुरू असलेल्या सर्व कामकाजाची पाहणी करून कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच, हे साहित्य संमेलन सर्व नाशिककरांचे असून सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कार्यक्रमस्थळी करण्यात आलेले फेरनियोजन(Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
बालसाहित्य मेळावा - मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत
कवी कट्टा - कॉलेज कँटीन जागेत
गझल कट्टा - सेमिनार हॉल
माझ्या जीवीची आवडी(Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
संमेलनाच्या पूर्व संध्येला 2 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता 'माझे जीवाची आवडी' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कवी संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक हृषीकेश देशपांडे, विभावरी आपटे जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी तर काव्यवाचन चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे करणार आहेत. या कार्यक्रमात देखील नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा -Mamata Banerjee Slammed Modi : छातीचा आकार किती असो, कोणीही अजिंक्य नाही - ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा