नाशिक- नाशिकरोड येथील अनुराधा सिनेमागृहाला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. हे सिनेमागृह गेल्या आठ वर्षापासून बंद असल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या सिनेमागृहाचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या चार बंबानी ही आग विझवली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेल्या 40 वर्षांपासून अनुराधा सिनेमागृह नाशिक रोड भागात प्रसिद्ध आहे. मात्र, मागील आठ वर्षांपासून हे सिनेमागृह बंद आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता अचानक या सिनेमागृहाला आग लागली. आग इतकी भीषण होती, की सिनेमागृहातून निघणारा धूर हा दूरपर्यंत दिसत होता.