नाशिक -राज्यात कोरोना रोगाव नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊ सुरू आहे. या लॉकडाऊनचा फटका येवल्यातील आंबे विक्रेत्यांना बसला आहे. कमी वेळेत आंबे विक्री होत नसल्याने लाखो रुपयांचे आंबे पडून आहेत.
आंबे विक्रीला वेळ वाढवून द्यावी -

येवल्यातील आंबे विक्रेत्यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त लाखो रुपयांचे आंबे भरले होते. मात्र, 23मेपर्यंत लॉकडाऊन असून यादरम्यान फळविक्रीला सकाळी 11 वाजेपर्यंतच वेळेचे बंधन असल्याने कमी वेळेत आंबे कसे विकावे असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. सणानिमित्त भरलेले आंबे वेळेच्या मर्यादेमुळे विक्री होत नसल्याने विक्री करता वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी येवला शहरातील आंबे विक्रेते करत आहेत.
आंबे विक्रेत्यांना मोठा फटका बसणार -
आंबे विक्री होत नसल्याने लाखो रुपयांचे आंबे तसेच पडून राहत असल्याने आंबे खराब झाल्यास मोठा फटका या आंबे विक्रेत्यांना बसणार आहे.