महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : लग्न कार्यात मंडप पूजनला विशेष महत्व - कन्यादान

मंडप 21 ताज्या हिरव्या बांबूचा असावा. उत्तर,दक्षिण,पूर्व पश्चिम या चार मुख्य दिशा सोबत आग्नेय,नैऋत्य, वायव्य,ईशान्य या चार उपदिशा आहे. येथे खड्डा करून तेल, मूग, सुपारी, हळद, कुंकू आदी पूजन सामग्री घेऊन खड्याची पूजा करून तेथे स्तंभ बांधायचे आहे.

mandap poojan
mandap poojan

By

Published : Nov 16, 2021, 3:34 PM IST

नाशिक :-विवाह सोहळ्यात प्रथम संस्कार कार्य म्हणजे मंडप पूजन. या मंडप पूजनला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. या पूजनानंतर देवाच्या आशीर्वाद प्राप्त होऊन विवाह कार्य निर्विघ्नपणे पार पडते अशी मान्यता असल्याचं महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितलं आहे.

महंत अनिकेत शास्त्री महाराज सांगतात पूजेचे महत्व

विवाह म्हटलं की दोन व्यक्तींच मनोमिलन नसतं तर दोन कुटुंबाचे मिलन असते.यातून आयुष्य भराची नाते जोडणारी असतात.म्हणून हे विवाह कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी धार्मिक विधी केल्या जातात. यात विवाह सोहळ्याच्या सुरवातीला वधू आणि वर दोघांच्या घरी मंडप पूजन केलं जातं.आणि हे पूजन झाल्यावर पुढील लग्न कार्य सुरू होतात.

मंडप पूजन
कसे करावे मंडप पूजन..मंडप 21 ताज्या हिरव्या बांबूचा असावा. उत्तर,दक्षिण, पूर्व पश्चिम या चार मुख्य दिशा सोबत आग्नेय,नैऋत्य, वायव्य,ईशान्य या चार उपदिशा आहे. येथे खड्डा करून तेल, मूग, सुपारी, हळद, कुंकू आदी पूजन सामग्री घेऊन खड्याची पूजा करून तेथे स्तंभ बांधायचे आहे. आणि ज्यांच्या हातून कन्यादान होणार आहे त्या जोडप्यांने या स्तंभाची पूजा करायची आहे. तसेच त्या स्तंभाच्या उच्च भागावरती लाल वस्त्र बांधून आणि मातीचा कलश तेथे ठेऊन क्षेत्रपाल भैरवाची स्थापना करून पूजा करून आवाहन करायचे आहे. हे केल्यास वधूला अखंड सौभाग्य लाभते आणि विवाह कार्य निर्विघ्नपणे पार पडते असं महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितले आहे.हेही वाचा -व्हाईट दुबे कोण?, काशिफ खान आणि समीर वानखडेचे काय संबंध? मलिकांनी केले WhatsApp चॅट्स उघड

ABOUT THE AUTHOR

...view details