नाशिक - नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव ( Nashik Commissioner Kailas Jadhav Transfer ) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. म्हाडाची साडे तीन ते चार हजार घरे नियमाप्रमाणे एमएचआरडीएला हस्तांतरीत न केल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या चौकशीचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर ( MLC Chairman Ramraje Nimbalkar ) यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी म्हाडाची घरे हस्तांतरीत न झाल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आज ( सोमवार ) विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभापती निंबाळकर यांनी महापालिका आयुक्त जाधव यांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.