महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विजयी, विजयानंतर रात्रभर कार्यकर्त्यांचा जल्लोष

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ हे विक्रमी मताधिक्‍याने विजय झाले. झिरवाळ यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी रात्रभर जल्लोष केला.

दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ विजयी

By

Published : Oct 25, 2019, 12:36 PM IST

नाशिक - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार नरहरी सिताराम झिरवाळ यांनी आघाडी घेतल्यामुळे परिसरात कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतल्यानंतर जल्लोषाला सुरूवात केली होती.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ विजयी

हेही वाचा... बागलाण विधानसभा मतदारसंघ : भाजपचे दिलीप भोरसे विजयी

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ निकाल

  • एकूण झालेले मतदान - 208506
  • नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) -124084
  • जना वतार(बसपा) - 2015
  • टी के बागुल (मनसे)- 3137
  • भास्कर गावित (सेना)- 63542
  • अरुण गायकवाड(वंचित)- 13436
  • नोटा - 2292

झिरवाळ यांच्या विजयानंतर दिंडोरीत रात्रभर दिवाळी

झिरवाळ यांची आघाडी प्रत्येक फेरीनंतर वाढत जात बाराव्या फेरीत गावीत यांना थोडेफार मताधिक्य मिळाले. मात्र, त्यानंतर परत झिरवाळ यांनी बक्कळ मते घेत आघाडी कायम राखली. 27 व्या फेरी अखेर नरहरी झिरवाळ यांना 124084 इतके विक्रमी मतदान झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे भास्कर गोपाळ गावित यांचा 60542 मतांनी दणदणीत पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण गायकवाड हे 13542 घेऊन तिसऱ्या स्थानी राहिले.

हेही वाचा... शिवसेनेच्या मजबूत गडाला राष्ट्रवादीचा दे धक्का; दिलीप बनकर विजयी

शिवसेनेचा तिकीट वाटपात झालेला घोळ व अंतर्गत गटबाजीने भास्कर गावित यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. अंतिम निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिंडोरी शहरात प्रचंड जल्लोष करत मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठे फटाके वाजवून झिरवाळ यांचे स्वागत केले. त्यानंतर झिरवाळ यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांच्याकडून निवडून आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details