महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : डॉक्टर वधूची होणार कौमार्य चाचणी? अंनिसची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार - कौमार्य चाचणी म्हणजे काय?

रविवारी 21 नोव्हेंबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये उच्चशिक्षित वधू-वराचा विवाह सोहळा होत आहे. यात वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात येणार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. राज्य सरकारकडून अशा क्रूरप्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

अंनिस
अंनिस

By

Published : Nov 20, 2021, 4:53 PM IST

Updated : Nov 20, 2021, 5:25 PM IST

नाशिक -नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या एक समाजाच्या लग्नात डॉक्टर असलेल्या वधूची कौमार्य चाचणी घेतली जाणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे प्राप्त झाली असून ही प्रथा बंद व्हावी, यासाठी अंनिसने त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अंनिस

सामाजिक वास्तव

देश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करत असला तरी देशाची सामाजिक वास्तव हे दाहक आहे, नाशिकही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने जात पंचायतीची अशी भयानक क्रूरप्रथा समाज समाजासमोर आणली आहे. जातपंचायतीच्या पंचाकडून डॉक्टर असलेला नववधूची लग्नाच्या रात्री कौमार्य चाचणी घेण्यात येणार आहे, ती थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करत आहे.

काय आहे कौमार्य चाचणी?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून जातपंचायत मूठमाती अभियान चालवले जाते. याअंतर्गत विविध पंचायतीद्वारे पुरस्कृत अनेक अनिष्ट, अघोरी, अन्यकारक रुढी, प्रथा समितीने थांबवल्या आहेत. समितीच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदासुद्धा संमत झाला आहे. असे असतानाही आजही एका समाजात लग्नावेळी वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. यात जातपंचायतीने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र वस्त्रावर वर-वधू यांनी झोपायचे असते. त्यावर रक्ताचा डाग पडला तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते, अन्यथा ते लग्न अमान्य करून अशा वधूस मारहाण करून तिच्या पालकांना शिक्षा व जबर आर्थिक दंड केला जातो. दंडाची रक्कम न भरल्यास तिच्या परिवाराला वाळीत टाकले जाते.

'पोलिसांनी कारवाई करावी'

रविवारी 21 नोव्हेंबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये उच्चशिक्षित वधू-वराचा विवाह सोहळा होत आहे. यात वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात येणार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. राज्य सरकारकडून अशा क्रूरप्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतू परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या चारित्र्यावर गदा येत आहे व मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने अंनिस या प्रथेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या मोहिमेत डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, समीर शिंदे, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे आदी कार्यकर्ते सामील झाले आहेत.

Last Updated : Nov 20, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details