महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साधू,महंतांना सांस्कृतिक मंत्री करा; महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांची मागणी - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे मागणी न्यूज

धर्मरक्षण व शास्त्र रक्षण हे राष्ट्रपुरुषाचे हृदय आहे, संस्कृत भाषा श्वास आहे, महाराष्ट्रात वेदवेदांचा, शास्त्रांचा, विद्यांचा व कलांचा अभ्यास अधिक फुलला. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदी या क्षेत्रातील व्यक्तींना स्थान द्यावे, अशी मागणी देखील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केली आहे.

Mahant Aniket Shastri Deshpande demanded that government should make sadhus and mahants cultural ministers
साधू,महंतांना सांस्कृतिक मंत्री करा; महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांची मागणी

By

Published : Dec 20, 2020, 6:26 AM IST

नाशिक - महाराष्ट्र सरकारने साधू, महंतांना सांस्कृतिक मंत्री करावे, अशी मागणी नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना केली आहे. ज्याप्रमाणे भारताचे कायदा मंत्री कायदेपंडित आहेत, आरोग्यमंत्री डॉक्टर आहेत त्याप्रमाणे भारतीय संस्कृती रक्षणाच्या वाढीसाठी आणि उद्धारासाठी महाराष्ट्रात सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून संस्कृती जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला अर्थात वैदिक, वैष्णव किंवा शैव परंपरेतील सन्मानित व्यक्तीला स्थान द्यावे, अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

साधू,महंतांना सांस्कृतिक मंत्री करा; महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांची मागणी

हेही वाचा -Ind Vs Aus: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर

धर्मरक्षण व शास्त्र रक्षण हे राष्ट्रपुरुषाचे हृदय आहे, संस्कृत भाषा श्वास आहे, महाराष्ट्रात वेदवेदांचा, शास्त्रांचा, विद्यांचा व कलांचा अभ्यास अधिक फुलला. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदी या क्षेत्रातील व्यक्तींना स्थान द्यावे, अशी मागणी देखील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केली आहे. भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी अखंडपणे काम करणाऱ्या व्यक्तीस राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून स्थान मिळावे अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री देशपांडे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या कडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details