नाशिक : छगन भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) आक्षेपार्ह व्यक्त करून अज्ञान प्रकट केलं आहे. कारण सावित्रीबाईंचा जो काव्य फुले हा ग्रंथ आहे, त्यात सावित्री फुले या स्वतः सरस्वती देवी आणि भगवान शंकरांच्या पूजक आहे, असं जाणवतं. त्यांच्या पुस्तकात त्यांनी सरस्वती देवी बाबत काव्य रचना करून विद्यार्थीनां शिक्षण दिले आहे. त्यांच्या या काव्य वरून शाळा हा सरस्वतीचा दरबार आहे असं सिद्ध होतं. त्यामुळे भुजबळांना एकच विनंती आहे समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्यांनी करू नये, तसेच सरस्वती ही पूर्ण विश्वाची देवी आहे आणि तीन टक्केच लोकांनीच सर्वांना शिकवले ( contravercy of sarsvati and savitribai phule ) आहे, हे विसरून चालणार नाही असं म्हणत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी भुजबळांना टोला लगावला. ( Mahant Aniket Deshpandes critisies to Bhujbal )
Chhagan Bhujbal : तीन टक्के लोकांनीच सर्वांना शिकवले; महंत अनिकेत देशपांडे यांचा भुजबळांना टोला - छगन भुजबळ
छगन भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) आक्षेपार्ह व्यक्त करून अज्ञान प्रकट केलं आहे. तीन टक्केच लोकांनीच सर्वांना शिकवले आहे हे विसरून चालणार नाही असं म्हणत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी भुजबळांना टोला ( Mahant Aniket Deshpandes critisies to Bhujbal ) लगावला. ( contravercy of sarsvati and savitribai phule )
महंत अनिकेत देशपांडे
काय बोलले होते छगन भुजबळ :अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही, ज्यांनी शिकवलं नाही, असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची ? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता.