महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Terrible Accident on Borgaon-Saputara Highway : लक्झरी बस आणि पिकपचा भीषण अपघात; तीन ठार, पाच जखमी - तीन ठार पाच जखमी

नाशिक येथील (In Nashik District) बोरगाव सापुतारा महामार्गावरील (Borgaon Saputara Highway) चिखली तालुका सुरगाणा येथे वणीकडून सापुताराकडे जाणारी लक्झरी बस आणि बोरगावकडून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप यांच्यात सायंकाळी भीषण अपघात (Luxury Bus and Pickup Crash) झाला. यात तीन ठार, तर पाच जखमी झाले. (Three Killed, Five Injured) यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. (The Condition of The Three is Critical)

Luxury bus and pickup crash
लक्झरी बस आणि पिकअपचा अपघात

By

Published : Jun 10, 2022, 9:35 AM IST

Updated : Jun 10, 2022, 9:45 AM IST

नाशिक : बोरगाव सापुतारा महामार्गावरील चिखली तालुका सुरगाणा येथे वणीकडून सापुताराकडे जाणारी लक्झरी बस आणि बोरगावकडून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप यांच्यात सायंकाळी भीषण अपघात झाला. यात तीन ठार, तर पाच जखमी झाले असून, यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


घटनेतील मृतांची नावे : या अपघातात पिकअप वाहनातील तीन जण कैलास पांडुरंग दळवी 26 (रा. ततानी तालुका कळवण) पंढरीनाथ मुरलीधर पंचावन्न (रा. सिंगारवाडी तालुका कळवण) नारायण देवराम पवार 50 (रा. घागरवाडा तालुका सुरगाणा) हे तीन जण जागीच ठार झाले.

घटनेतील जखमींची नावे :या अपघातात भास्कर पांडुरंग राऊत 27 (रा. ततानी तालुका कळवण) सुनील पुंडलिक बागुल 30 (रा. बेंदीपाडा तालुका कळवण) किशोर साबळे 19 (रा. ततानी तालुका कळवण) सावळीराम बबन साबळे 40 (रा. तळणी तालुका कळवण) यशवंत महादू गायकवाड 41 (रा. ततानी तालुका कळवण) यशवंत सोमा राऊत 45 (रा. शिंगारवाडी तालुका कळवण) या जखमी झाले असून, त्यांना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

माहिती मिळताच पोलिसांनी दाखवली तत्परता : या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. अपघाताबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, त्यातील सावळीराम साबळे व यशवंत गायकवाड यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे करीत आहेत.

हेही वाचा : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Last Updated : Jun 10, 2022, 9:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details