नाशिक -नाशिकच्या निफाड तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार दिसून आला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने चार गावातील 10 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला असून जनावरांच्या लसीकरणावर जोर दिला आहे.
निफाड तालुक्यातील मौजे ओझर, शिंगवे, कोठुरे, विजयनगर या चार गावातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा आजार दिसून येत आहे. या आजाराची अधिक तीव्रता लहान वासरांमध्ये याची दिसून येत आहे. पशुमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव माशा, गोचडी, डास यांच्यामार्फत होत असल्याचे समोर आले आहे.
ही आहे आजाराची लक्षणे
लंपी स्किन डिसीज हा आज प्रामुख्याने गाय, म्हैस या जनावरांमध्ये अधिक दिसून येत आहे. या आजारात बाधित झालेल्या जनावरांना पोट, डोके, मान, पायाच्या त्वचेवर तीन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. ताप, भूक मंदावणे, नाकातून स्त्राव गळणे या आजारात मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी गाय म्हशीच्या दूध देण्यावर परिणाम होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.