नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम प्रत्येक नागरिकांवर झाला आहे. तितकाच तो जंगली प्राण्यांवर देखील झाल्याचे समोर आले आहे. संचारबंदीच्या काळात सर्वचजण आपल्या घरात असल्याने नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊन इफेक्ट, नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले 60 टक्क्यांनी कमी - nashik latest news
मागील काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने भक्ष्याच्या शोधत मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांकडून नागरिकांवर होणारे हल्ले वाढले होते. मात्र, संचारबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील शेतातील कामे देखील बंद झाल्यामुळे बिबट्यांनकडून होणाऱ्या हल्ले ६० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
नाशिक जिल्ह्याची कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळख आहे. येथे द्राक्ष, कांदा, मका यासोबत ऊसाचे देखील मोठे क्षेत्र आहे. यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या देखील मोठी आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यात 226 बिबटे असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक बिबटे हे गोदावरी, दारणा आणि कदवा नदी किनाऱ्याच्या ऊस क्षेत्रात असल्याचे आढळून आले आहे. मागील काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने भक्ष्याच्या शोधत मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांन कडून नागरिकांवर होणारे हल्ले वाढले आहेत. मात्र, संचारबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील शेतातील कामे देखील बंद आहे. साहजिक या काळात प्रत्येक जण घरात असल्याने बिबट्यांन कडून मनुष्यावर होणारे हल्ले कमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांची संख्या इगतपुरी, निफाड, सिन्नर आणि दिंडोरी या तालुक्यात आहे. हा भागात नदी किनारी मुबल पाणी, लपण्यासाठी उसाचे शेत अनेक भटकी कुत्री, शेळ्या मेंढ्या सहज मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षात रस्ते अपघात 36 बिबट्याचा मृत्यू झाला आहे.