महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू - small girl

गायत्री प्रकाश गांगोडे असे या मृत मुलीचे नाव आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात बालकांचा मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे.

मृत बालिका

By

Published : Mar 14, 2019, 11:09 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गायत्री प्रकाश गांगोडे असे या मृत मुलीचे नाव आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात बालकांचा मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे.

या घटनेबाबत वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात बिबट्याने हल्ला करून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चारच दिवसांपूर्वीच मातेरेवाडीमध्ये घडली.
परमोरी शिवारातील वरखेडा रोडवरील मॅकडॉल कंपनी लगत असलेल्या वस्तीनजीक शेतात काम करत असताना आईसोबत असलेल्या गायत्रीवर बिबट्याने अचानक हल्ला करून तिला उसाच्या शेतात फरफटत नेले आणि ठार केले. दिंडोरी वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. दिडोरी परिसर हा बिबट्यांचा वावर असलेले क्षेत्र आहे.

या परिसरात ऊस, द्राक्ष, गहू अशी बागायती आणि दीर्घकालीन पिके घेतली जातात. यामुळे या परिसरात बिबट्यांच्या अधिवासास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे बिबट या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. परमोरी शिवारात रात्री उशिरा पर्यंत बिबट्याचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी बंदोबस्त केला आहे. दिंडोरी परिसरात शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर शेतात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details