नाशिक -नाशिकमधील टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाणला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भद्रकाली पोलिसांनी समीर पठाणला इगतपुरीतून ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी शिवसेनाप्रणित अवजड वाहतूक सेनेचा पदाधिकारी
नाशिक -नाशिकमधील टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाणला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भद्रकाली पोलिसांनी समीर पठाणला इगतपुरीतून ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी शिवसेनाप्रणित अवजड वाहतूक सेनेचा पदाधिकारी
नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी बळकावत आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असतानाच आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगच्या एका म्होरक्याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून हा संशयित आरोपी शिवसेनाप्रणित अवजड वाहतूक सेनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. समीर पठाण असे या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी भद्रकाली पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला इगतपुरीतून ताब्यात घेतले. काही महिन्यांपूर्वी त्याने शालिमार परिसरात एका इसमाचे अपहरण करून त्याला घोटी परिसरामध्ये बेदम मारहाण करत सोडून दिल्याची घटना उघडकीस आली होती.
खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक
भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात रक्तदान शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाला खासदार, आमदार आणि सेनेचे लोकप्रतिनिधी तसेच नगरसेवकदेखील उपस्थित होते, त्यामुळे त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. यात पोलीस यंत्रणेला आव्हान देण्यात आल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाडस दाखवत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.