महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी जामीन खरेदी वादात ? - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

संजय मिश्रीमल पुनुमिया माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी काम करत होती. त्यांनी मुंबई-नागपूर असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नगर, इगतपुरी,नाशिक सिन्नर व लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती जमीन घेतल्याची चर्चा आहे.

parambir singh
parambir singh

By

Published : Oct 12, 2021, 1:57 PM IST

नाशिक -शेतकरी नसतानाही शेतकरी असल्याचा बनावट दाखला देत मुंबई येथील संजय मिश्रीमल पूनुमिया यांनी सिन्नर येथे जमीन घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सिन्नर तालुका दुय्यम निबंधकांनी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पूनमिया हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी जमिनीचा व्यवहार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सिन्नर येथील मौजे धरणगाव येथे मिळकत खरेदी करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत राज्य गुप्तचर विभागाकडे तक्रारीनंतर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन याबाबत कागदपत्रांची तपासणी केली. तेथे मुंबई येथे राहणारे संजय पूनुमिया यांनी सिन्नर ते मौजे धरणगाव येथे शेतकरी असल्याचा खोटा दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. याबाबत सिन्नर येथील दुय्यम निबंधकांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यापूर्वी संजय मिश्रीमल पूनुमिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, अटक करण्यात आली आहे. पूनुमिया याला ताब्यात घेण्यासाठी आता सिन्नर पोलिस न्यायालयात अर्ज करणार असल्याचे समजते .

अनेक जमिनी खरेदी केल्याची चर्चा
संजय मिश्रीमल पुनुमिया ही व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पपरमबीर सिंग यांच्यासाठी काम करत केल्याचे समजते. त्यांनी मुंबई-नागपूर असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नगर, इगतपुरी,नाशिक सिन्नर व लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती जमीन घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा -रवी राणांची आमदारकी धोक्यात?...अपात्रतेची कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details