महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सेंट्रिंग काम करणाऱ्या मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

याबाबत फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित बिल्डरवर कारवाई केली जाईल असे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी दिलेत आहेत.

सेंट्रींग काम करणाऱ्या मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

By

Published : Jul 13, 2019, 8:07 PM IST

नाशिक -शहरातील बांधकाम मजुराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काम करणाऱ्या मजूर बारा मजल्याच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडल्याची घटना घडली. या मजुराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिकच्या पाईपलाईन रोड जवळ असलेल्या रुंगाठा ग्रुपच्या तिरूमला लक्झरी या इमारतीचे काम चालू असताना लिफ्टच्या सहाय्याने प्लेट वर घेऊन जात असताना हा अपघात घडला. बबलू असे या मजूराचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

सेंट्रींग काम करणाऱ्या मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

जखमी मजूर परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून चार मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. मात्र, यातील मुख्य संशयित आरोपी बिल्डर सुजय गुप्ता याला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. या घटनेमुळे बिल्डिंगच्या बांधकामात होणार हलगर्जीपणा समोर आला आहे. याबाबत फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित बिल्डरवर कारवाई केली जाईल, असे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी दिलेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details