नाशिक - शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित के.एन.केला महिला महाविद्यालयाने विद्यापीठात फीची रक्कम न भरल्याने 125 विद्यार्थिनींचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. परीक्षा यादीत त्यांचे नावे नसल्याने ही बाब समोर आली आहे.
विद्यार्थिनींची शुल्क विद्यापीठाला मिळालीच नाही -
विद्यार्थिनींनी शैक्षणिक शुल्क भरूनही सव्वाशे विद्यार्थिनींचे शुल्क विद्यापीठात भरले नसल्यामुळे त्यांचे परीक्षा यादीत नाव आले नाही. साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित के एन केला महिला महाविद्यालयातील हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनींमध्ये आपले शैक्षणिक वर्ष आणि शुल्क वाया जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रकारावर विद्यार्थिनींनी नाशिकरोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांची भेट घेतली होती. त्यानुसार दिवे यांनी तुमचे नुकसान होऊ देणार नाही असे त्यांना आश्वासन दिले. याविषयावर के. जे. मेहता हायस्कुलच्या प्राचार्यानीं सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. या संस्थेने विद्यार्थीनींकडून जास्त शुल्क घेतल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.