महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Javed Akhthar in Sahitya Sanmelan : गुलामी नको तर देशाशी इमानदारी ठेवा - जावेद अख्तरांचा साहित्यकांना सल्ला

गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar on Sahitay Sanmelan ) म्हणाले, मराठी साहित्य संमेलनात जाण्यास योग्य आहे की नाही, हा विचार माझ्या मनात आला. पण छत्रपती शिवाजी महाराज व पेशव्यांच्या दरबारात पोव्याड्यांसोबत शायरही होत असायची, हे मी वाचले होते. त्यामुळे मी संमेलनाला आलो आहे.

जावेद अख्तर
जावेद अख्तर

By

Published : Dec 3, 2021, 10:32 PM IST

Updated : Dec 3, 2021, 10:55 PM IST

नाशिक - साहित्यिकांनी जनतेच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. जनतेला हवे ते लिहिले पाहिजे. साहित्यिकांनो, तुम्ही राजकीय पुढार्‍यांचे गुलाम न होता ( Javed Akhtar Advice to writers in Nashik ) देशाशी इमानदारी ठेवावी, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व गीतकार जावेद अख्तर यांनी मांडले आहे. ते भुजबळ नाॅलेज सिटी येथे शुक्रवारी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Javed Akhtar as Guest in Sahitya Sanmelan ) उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

गीतकार जावेद अख्तर म्हणाले, की साहित्य व राजकारण यांचे नेमके नाते काय, हा प्रश्न मला अनेकदा पडतो. अनेकजण आम्हाला या विषयात रस नाही असे सांगतात. तर काहीजण शिव्या देतात. अख्तर पुढे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनात जाण्यास योग्य आहे की नाही, हा विचार माझ्या मनात आला. पण, छत्रपती शिवाजी महाराज व पेशव्यांच्या दरबारात पोव्याड्यांसोबत शायरही होत असायची, हे मी वाचले होते. त्यामुळे मी संमेलनाला आलो, असे सांगत त्यांना दिलेल्या निमंत्रणांवरुन टीका करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले.

ज्येष्ठ विचारवंत व गीतकार जावेद अख्तर यांचे भाषण

हेही वाचा-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : पाहा ग्रंथदिंडीची काही क्षणचित्रे...

कूपमंडुक वृत्तीच्या लोकांमुळे भाषेवरून वाद

बोलण्याचे, संवादाचे माध्यम म्हणजे भाषा आहे. मात्र जगात भाषाच वादाचे कारण झाले आहे. जनतेच्या दुःखावर बोलले की तुमच्यावर देशविरोधी असल्याचा आरोप केला जातो. कूपमंडुक वृत्तीच्या लोकांमुळे भाषेवरून वाद घडत आहेत. मराठीत संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, उत्तरेतील संत तुलसीदास यांचे दोहे हे खरे अभिजात साहित्य आहे. पुर्वी महिला कशी लिहिणार, लिहिण्याचा अधिकार पुरुषांना आहे असे प्रघात होते. १८ व्या शतकात पाश्चात्य त्य देशातील महिला पुरुषांच्या नावाने लिहायच्या. मात्र, आठशे वर्षापुर्वी मुक्ताबाई या लिहित होत्या, या शब्दात त्यांनी मराठी भाषेचा गौरव (Poet Javed Akhtar praised Marathi ) केला.

हेही वाचा-जयंत नारळीकर आले असते तर बरे झाले असते - कौतिकराव ठाले पाटील

स्वयंघोषित देशभक्तांना फटकारले -

साहित्य जोपर्यंत सौंदर्य दाखवते तोपर्यंत ते खूप चांगलं वाटते. पण तीच कला जेव्हा वास्तव व्यक्त करते तेव्हा दाहक वाटते, या प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केला. जेव्हा तुम्ही जनतेच्या दुःखावर बोलले की तुमच्यावर देशविरोधी असल्याचा आरोप केला जातोय या शब्दांमध्ये त्यांनी स्वयंघोषित देशभक्तांना फटकारले आहे.

हेही वाचा-Nashik Sahitya Sammelan 2021 : पाहा 'असा' झाला मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा..

Last Updated : Dec 3, 2021, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details