महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमधील मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम - नाशिकमधील मुरलीधर मंदिर बातमी

नाशिकमधील मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

नाशिकमधील मुरलीधर मंदिर

By

Published : Aug 22, 2019, 3:16 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कापड बाजारातील प्राचीन मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे याठिकाणी १६ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्माष्टमी उत्सवाबाबत माहिती देताना मंदिरातील पुजारी

उत्सव काळात कृष्णाला विविध रुपात सजवले जाते. यात श्रीकृष्ण झुल्यावर, अर्धनारी नटेश्वर रुपात, चंद्रावर, गरुडावर, शेषनागावर विराजमान असतात. जन्माष्टमी उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. तसेच जन्माष्टमीच्या १ दिवस आधी रात्री भजन, किर्तन होऊन ठीक १२ वाजता कृष्णजन्माच्या वेळी मोठा सोहळा संपन्न होतो.

कार्यक्रमानिमित्त जिल्हाभरातून भाविक येथे येत असतात. या मुरलीधराकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते असल्याची भक्तांची श्रद्धा असून वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. एकूण या मुरलीधराच्या मंदिरात जन्माष्टमी उत्सवाची धूम बघायला मिळते.

मंदिराबाबत माहिती

धार्मिक आध्यात्मिक नगरी सोबत मंदिरांचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिक मध्ये असलेल्या कापड बाजारातील प्राचीन मुरलीधर मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. या मंदिरात जन्माष्टमी उत्सव जोरात साजरा केला जातो. ८ दिवस सलग येथे धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथे असलेल्या अखंड पाषाणातील ३ फुटाची कृष्णाची मूर्ती १८२५ साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. आज त्यांची १५वी पिढी या मंदिराची देखभाल करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details