नाशिक - माणसात कष्ट, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असली तर कोणताही त्याला यश संपादन करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. घोटीतील युवकाने हे खरं करून दाखवलंय.
आंतरराष्ट्रीय धावपटूने तब्बल 16 वर्षांनंतर दहावीत मिळवले यश... - maharashtra ssc results
माणसात कष्ट, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असली तर कोणताही त्याला यश संपादन करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. घोटीतील युवकाने हे खरं करून दाखवलंय.
स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक करणाऱ्या धावपटू निलेश बोराडे या युवकाचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे देशसेवेची इच्छा असणाऱ्या युवकाला सैन्यात जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली. मात्र त्याने मोठ्या जिद्दीने दहावीची परीक्षेत यश मिळवल्याने आता त्याचा मार्ग सुकर झाला आहे. घोटीतील राष्ट्रीय धावपटू वयाच्या तिसाव्या वर्षी दहावीत ६५ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याने देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने निलेशला सातवीत शिक्षण सोडावे लागले. मातीखाण काम करून दररोज ३० किलोमीटर मुंबई नाशिक महामार्गावर धावण्याचा सराव करत अखेर चौदा वर्षांनी त्याने दहावीत घवघवीत यश संपादन केले. देशाच्या अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत धावणारी आंतरराष्ट्रीय धावपटू सुपी सुपिया सोबत धुळे ते कसारा २३० किलोमीटर अंतरावर साथ दिली.
जम्मू-काश्मीर, दार्जिलिंग, गुहाटी, कारगिल यांसह देशाच्या विविध राज्यात मॅरेथॉनमध्ये निलेशने भाग घेत देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख निर्माण केली. विविध स्पर्धांच्या माध्यमातून आत्ता पर्यंत बारा हजार पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम त्याने केला आहे. यातून अनेक गोल्ड मेडल मिळवले आहे. आता निलेशने दहावीच्या परीक्षेत यश मिळवत लष्करात भरती होण्यास तो सज्ज झाला आहे.