नाशिक - गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 218 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 157 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 7 हजार 2 वर पोहचली आहे. एकट्या नाशिक शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 4 हजार 84 झाली असून आतापर्यँत जिल्ह्यात 332 जणांचा बळी गेला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 4 हजार 519 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 259 प्रतिबंधित क्षेत्र असून ह्या भागात कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या अँटिजन' चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यँत नाशिक रोड आणि पंचवटी वडाळा भागात चाचणी करण्यात आली आहे. अर्धा तासांत अहवाल मिळत असल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. मृत्यूचे प्रमाण यामुळे कमी होणार असल्याचे महानगरपालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.