नाशिक - सातत्याने वाढत्या इंधन दर वाढीमुळे आता नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त ( Moment of Akshayya Tritiya ) साधत नाशिक शहरात ग्राहकांनी 600 हुन अधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी ( Purchase of more than 600 electric vehicles Nashik ) केली आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विक्री पटीने वाढ झाल्याचे इलेक्ट्रिक वाहन विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनीही आता इलेक्ट्रिक वाहनांना ( Electric vehicle Nashik ) पसंती द्यायला सुरुवात केली आहे.
नाशिक शहरात पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर, तर डिझेलचे दर 103 रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अशाच वाहनधारकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पारंपारिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागरिक पेट्रोल डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिक शहरात सुमारे 500 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. तर 125 हुन अधिक तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. त्यापाठोपाठ चार चाकी वाहनांमध्ये नवीन प्रकारच्या वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.